चंदगड : सी एल वृत्तसेवा
होसूर (ता. चंदगड) येथे काल दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री घरपोडीचा प्रयत्न झाला. कोवाड- बेळगाव मार्गावरील होसूर घाट रस्त्यालगत होसूर येथील रहिवाशी जेरोन फ्रान्सिस करवालो यांचे राहते घर आहे. ते आपल्या बेळगाव येथील घरी काही दिवसांसाठी गेले असता त्यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. घराचे गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटे उघडून सर्व साहित्य विस्कटून टाकले. पण चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या घटनेची नोंद अद्याप पोलिसात झालेली नाही.
या घटनेबाबत घरमालक जेरोन करवालो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बेळगाव येथील टेक्निशियन मार्फत चोरीच्या आधी केवळ दोन दिवस म्हणजे मंगळवारी घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून रात्री अकराच्या सुमारास त्यांनी घराचे गेट व कुलूप तोडल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे करवालो यांनी सांगितले. या सीसीटीव्हीचे फुटेज वरून पोलिसांना चोरट्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार आहे.
No comments:
Post a Comment