चंदगड (सी एल वृत्तसेवा)
गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भारतीय जनता पक्षाचे भावकू गुरव यांची, तर उपसभापती पदावर काँग्रेसचे पांडुरंग नाईक यांची बिनविरोध निवड झाली. सहकार सहायक निबंधक अनिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल तालुक्यात विस्तारलेल्या या बाजार समितीला गेल्या काही वर्षापासून आर्थिक घरघर लागली आहे. त्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असून त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. ते ओळखून या समितीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी सर्वांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली. त्याप्रमाणे प्रत्येकाला संधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सलग तीन वर्षे दिलेल्या विविध पक्षाच्या संचालकांना पदांवर संधी देण्यात आली. पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसला, दुसऱ्यांदा काँग्रेसला, तर यावर्षी भाजपला सभापतिपदाची तर जनता दल आणि काँग्रेसला उपसभापतिपदाची संधी मिळाली.
दरम्यान सहकार निबंधक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची प्रक्रिया सुरू झाली. सभापतीसाठी गुरव, तर उपसभापतीसाठी नाईक यांनी अर्ज दाखल केला. गुरव व नाईक यांना अनुक्रमे अशोक चराटी, अभयसिंह देसाई सूचक, तर रामदास पाटील व रामगोंडा पाटील हे अनुमोदक राहिले. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने दोघांचीही निवड शिंदे यांनी बिनविरोध घोषित केली.
No comments:
Post a Comment