चंदगड : सी एल वृत्तसेवा
सध्या मंडळ अधिकारी तलाठी यांना कार्यालयीन कामे संगणकावर करावी लागत आहेत. शासनाकडून ऑनलाइन कामांचा भडिमार सुरू असला तरी ही कामे करण्यासाठी देण्यात आलेले संगणक, लॅपटॉप, बॅटरी, कीबोर्ड कालबाह्य झाल्याने लोकांची कामे वेळेत होऊ शकत नाहीत. अनेक ठिकाणी या सुविधा नादुरुस्त झाल्या आहेत तथापि ते दुरुस्त करून घेण्यासाठी शासनाकडून कोणतीच आर्थिक तरतूद नसल्याने अनेक साहित्य धुळखत पडले आहे. परिणामी शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक यांची शासकीय कामे वेळेत होत नाहीत. त्यांना एका कामासाठी अनेक वेळा कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. यातून मार्ग काढावा यासाठी तलाठी मंडळ अधिकारी यांनी ऑनलाइन कामे बंद आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाच्या पाठिंबासाठी आता चंदगड तालुक्यातील शिंदे शिवसेनेने उडी घेतली असून तलाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्यांची तात्काळ पूर्तता न केल्यास त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. असा इशारा शिंदे शिवसेनेचे प्रताप उर्फ पिनू पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच तहसील कार्यालय चंदगड येथे दिले आले आहे.
No comments:
Post a Comment