कालकुंद्री येथे:'राजे उमाजी नाईक नगर' नाम फलकाचे उद्घाटन करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे गाव असलेल्या कालकुंद्री गावाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. गावठाण जागा अपुरी पडत असल्याने कागणी मार्गावरील गुंडाडा नावाच्या परिसरात अनेक घरे झाली आहेत. या परिसरात झालेल्या लोक वस्तीला इंग्रजांविरुद्ध झालेल्या सशस्त्र उठावात मोलाचे योगदान दिलेल्या 'आद्य क्रांतिकारक- उमाजी राजे नाईक' यांचे नाव देण्यात आले आहे. या नामफलकाचा अनावरण सोहळा स्वातंत्र्यदिनानिमित्त पार पडला. सरपंच छाया जोशी यांच्या हस्ते नाम फलकाची पूजन करण्यात आले. उद्घाटन उपसरपंच संभाजी पाटील यांच्या हस्ते झाले. सदस्य विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर, गीता नाईक, तंटामुक्त अध्यक्ष रमेश पाटील, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत माजी उपसरपंच सुरेश नाईक यांनी केले. यावेळी बोलताना विलास शेटजी यांनी नवीन वस्तीला क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचे नाव देऊन इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्लक्षित योद्ध्याचा एक प्रकारे सन्मानच केला आहे असे प्रतिपादन केले. येत्या काळात या नगरला ग्रामपंचायत कडून प्राधान्याने रस्ता, लाईट, पाणी अशा सर्व सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही दिली. यावेळी शाहिर बाजीराव पाटील, रोजगार सेवक भरमु पाटील, नरसू तेऊरवाडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी नाईक, सिद्धाप्पा नाईक, पुंडलिक नाईक, मारुती नाईक, कल्लाप्पा ना. नाईक, कल्लाप्पा रा. नाईक, हणमंत नाईक, लक्ष्मण नाईक, बालाजी नाईक, मोहन नाईक, शिवराज नाईक, किसन नाईक, प्रवीण नाईक आदी समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment