कुदनूर येथे कायम स्वरूपी डॉक्टरची गरज, ग्रामपंचायत ने लक्ष द्यावे - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2025

कुदनूर येथे कायम स्वरूपी डॉक्टरची गरज, ग्रामपंचायत ने लक्ष द्यावे



कुदनूर : सी एल वृत्तसेवा/ सचिन तांदळे 
    कुदनूर हे चंदगड तालुक्यातील मोठे गाव असूनही गावात कायमस्वरूपी राहणारा खाजगी किंवा शासकीय एकही डॉक्टर उपलब्ध नाही. रात्री अपरात्री अचानक आजारी पडल्यास नागरिकांची आरोग्य व्यवस्था रामभरोसे झाली आहे. स्थानिक डॉक्टर नसल्याने अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगी पेशंट व नातेवाईकांना कोवाड, गडहिंग्लज किंवा बेळगाव अशा ठिकाणी मिळेल त्या वाहनाने पेशंटला पळवावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायत ने गावात कायमस्वरूपी राहणाऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
 कायम निवासी डॉक्टर नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खरे तर कुदनूर ग्रामपंचायतीने यासाठी कायम स्वरुपी तोडगा काढणे गरजेचे आहे. कुदनूरची लोकसंख्या सुमारे 7000 हजार आहे. येथे बाजार पेठ असल्याने जवळ जवळपास 35 खेड्यांचा  संपर्क येतो. गावात 7 मेडीकल औषध दुकाने आहेत. गावात अपरात्री एखाद गंभीर पेशंट आजारी असल्यास जावे कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोठे गाव असल्यामुळे येथे 24 तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध असेल अशा समजुतीतून परिसरातील बरेच पेशंटचे नातेवाईक रात्री अपरात्री गावात खाजगी वाहनाने पेशंटला घेऊन येत असतात. मात्र निवासी डॉक्टर नसल्याने पंचायत होते. मात्र डॉक्टर नाही असे समजल्यानंतर गंभीर परिस्थिती उद्भवते.  ही बाब कुदनूर गावासाठी भूषणावह नाही. 
त्यामुळे येथे कायमचा निवाशी डॉक्टर असणे आत्ता महत्त्वाचे झाले आहे. यावर गावकऱ्यांनी चिंतन करणे गरजेच झाले आहे.

No comments:

Post a Comment