रोटरी क्लब बेळगाव व चंदगड पत्रकार संघाच्या वतीने 'कान मशिन' वाटप, नाव नोंदणीचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2025

रोटरी क्लब बेळगाव व चंदगड पत्रकार संघाच्या वतीने 'कान मशिन' वाटप, नाव नोंदणीचे आवाहन

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम- बेळगाव आणि चंदगड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड, आजरा, गडहिंग्लज व बेळगाव तालुक्यातील श्रवणदोष मुळे कमी ऐकू येणाऱ्या गरजू नागरिकांसाठी श्रवण यंत्र (कान मशिन) वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोवाड, ता. चंदगड येथे आयोजित शिबिरात नागरिकांच्या  कानांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना श्रवण यंत्र देण्यात येणार आहे. सुमारे ४० ते ४५ हजार रुपये किमतीचे हे अत्याधुनिक मशीन यावेळी केवळ नाममात्र किंमतीत उपलब्ध होणार आहे. 

        या शिबिरात मर्यादित श्रवण यंत्रे वाटप करण्यात येणार असल्याने आधी नोंद केलेल्या रुग्णांनाच याचा लाभ मिळेल याची नोंद घेऊन लवकरात लवकर आपली नावे नोंदवावीत. असे आवाहन रोटरी क्लब वेणूग्राम चे पदाधिकारी व निवृत्त नौदल अधिकारी ए. के. पाटील व चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील (कालकुंद्री) यांनी केले आहे. नाव नोंदणी पूर्ण होताच श्रवण यंत्र वाटप कार्यक्रम तारीख जाहीर केली जाईल. तरी गरजू नागरिकांनी  9552040015, 9423270222, 9448115362 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment