कोवाड मर्चंट पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा १७ रोजी - चंदगड लाईव्ह न्युज

12 August 2025

कोवाड मर्चंट पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा १७ रोजी

  


 कालकुंद्री :  सी एल वृत्तसेवा 

    कोवाड (ता. चंदगड) येथील दि. कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता कोवाड येथील संस्था इमारत सभागृहात बोलवण्यात आली आहे. यावेळी नियमानुसार सर्व विषयांसह संस्थेच्या ३ सप्टेंबर रोजी आयोजित रौप्य महोत्सव कार्यक्रम व विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तरी सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे. असे आवाहन चेअरमन दयानंद मोटुरे, व्हा. चेअरमन उत्तम मुळीक, मॅनेजर पी. पी. पाटील व सर्व संचालक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment