दाटे केंद्रशाळेत शिक्षण परिषद उत्साहात, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2025

दाटे केंद्रशाळेत शिक्षण परिषद उत्साहात, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    दाटे केद्रातंर्गत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख विश्वनाथ गावडे होते. शिक्षण परिषदेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री. गावडे यांनी शैक्षणिक वर्षातील नियोजित उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल केंद्र शाळा दाटेचा विद्यार्थी कु. शौर्य चाळूचे व मार्गदर्शक शिक्षक गोपाळ डुरे, तसेच वि.मं. गुडेवाडी शाळेचा विद्यार्थी कु. विघ्नेश पाटील व मार्गदर्शक शिक्षक दिनकर तावडे यांचा सत्कार करण्यात आला.नवभारत साक्षरता अभियानात १२२% उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव माईनकर यांचा शिक्षकवृंदाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

    यावेळी नामदेव माईनकर यांनी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी पी.जी.आय. कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याने मिळवलेल्या प्रथम क्रमांकाचे श्रेय शिक्षकांच्या सातत्यपूर्ण कार्याला दिले. शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध स्पर्धांमधून तालुक्याचे नाव उंचावावे, तसेच शासनाच्या सर्व शैक्षणिक योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.परिषदेच्या शिक्षण सत्रात साधन व्यक्ती म्हणून डॉ. वर्षा बलांडे, दयानंद पाटील, रिना पाटील यांनी पॅट परीक्षा, आयडॉल शिक्षक, अध्ययन निष्पत्ती, शाळाबाह्य विद्यार्थी, स्वाफ, पी. जी. आय., नास सर्व्हे, १ ली-२ री नवीन अभ्यासक्रम, गणित अध्यापनाच्या विविध पद्धती आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. 

    आयडॉल शिक्षक यांवर बाबुराव वरपे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात वि.मं. वरगांवचे रविंद्र कुंभार, आदित्य बारब्दे, नरसू पाटील, नामदेव पाटील यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.सूत्रसंचालन सुनीता साळुंखे यांनी केले, तर आभार दयानंद पाटील यांनी मानले. परिषदेस दाटे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment