रामपुर येथे महसूल सप्ताह निमित्त वृक्ष लागवड - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2025

रामपुर येथे महसूल सप्ताह निमित्त वृक्ष लागवड

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह निमित्त रामपूर (ता.चंदगड) येथे वृक्षलागवड उपक्रमांतर्गत पाणंद रस्त्याच्या दुतर्फा जंगली रोपांची वृक्षलागवड नागनवाडी(ता.चंदगड)चे मंडल अधिकारी देवीदास तारडे व तांबुळवाडी सजाचे तलाठी प्रथमेश देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे स्वागत बाबुराव वरपे यांनी केले. 

    यावेळी मंडल अधिकारी देवीदास तारडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'महसूल सप्ताह' निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले असून त्यापैकीच  वृक्षलागवड हा उपक्रम आहे.ह्या उपक्रमात सर्व नागरिक, ग्रामस्थ, शाळा यांचा सहभाग महत्वाचा असून पर्यावरण समतोल साठी वृक्षारोपण व संवर्धन महत्वाचे आहे असे सांगितले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी प्रथमेश देसाई यांनीही वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले.यांवेळी रामपूर ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक व सामाजिक कार्यकर्ते अमित वरपे यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे पडीक जागा, शेत बांध ह्या ठिकाणी वृक्षारोपण करुन त्यांचे चांगले पद्धतीने संवर्धन करणेचे आवाहन केले.

    या उपक्रमासाठी शासनाचा 'वृक्षमित्र ' पुरस्कार प्राप्त शिक्षक बाबुराव वरपे यांनी जांभूळ, साग, आंबा, फणस अशी रोपे स्वखर्चाने देवून शासनाच्या 'शतकोटी वृक्षलागवड' मोहीमेला सहकार्य केले. यावेळी सेवा सोसायटी सचिव सुनिल देवण, सेवानिवृत्त शिक्षक राणबा ढेरे, रत्नाहार पाटील, दयानंद गावडे, गोपाळ देवण, धोंडीबा यादव, वसंत यरोळकर, अरविंद गावडे, नाना गावडे, उत्तम यरोळकर, पांडुरंग ढेरे, सागर घोळसे, यमणाप्पा वरपे, राजू वरपे  यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार बाबुराव वरपे यांनी मानले.

No comments:

Post a Comment