चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अनोख्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात टिळक व अण्णा भाऊ यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात टिळक व अण्णा भाऊ यांच्या प्रतिमापूजनाने झाली. पूजन विद्यालयाचे प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सृष्टी गावडे हिने केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पाटील सर उपस्थित होते. प्रमुख वक्ते मच्छिंद्रनाथ गुरव यांनी अण्णा भाऊ साठे यांचे प्रतिभावान कार्य विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले, तर ज्येष्ठ अध्यापक व्ही. के. गावडे यांनी टिळकांच्या राष्ट्रनिष्ठेवर भाष्य करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
विद्यार्थिनी स्वरा गडकरी, गार्गी गाव डे,अनन्या गुरव, स्पृहा पाटील आणि संभव कुंभार यांनी आपल्या मनोगतातून टिळक व साठे यांच्या विचारांचा गौरव केला. उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी टिळकांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा सविस्तर आढावा घेतला.
या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय साबळे, अमरकांत पाटील, व्ही. एस. मोहनगेकर, टी. व्ही. खंदाळे, वैशाली पाटील, शरद हदगल, ओंकार पाटील, प्रियाराणी बुरूड यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कु. आदिती सूर्यवंशी व रिया मुजावर यांनी केले, तर आभारप्रदर्शन कु. श्रेयशी तेजम हिने केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाने अत्यंत शिस्तबद्धरीत्या पार पाडले. राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्याची आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून लाभली.
No comments:
Post a Comment