पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांची २०१०-११ ची ऊस बिले अथर्व प्रशासन कडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2025

पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांची २०१०-११ ची ऊस बिले अथर्व प्रशासन कडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

 

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र

हलकर्णी: सी. एल. वृत्तसेवा

        अथर्व इंटरट्रेड प्रा. लि., कोल्हापूर या कंपनीने दौलत कारखाना सरफेसी कायद्या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा बँके बरोबर झालेल्या करारानुसार भाडे तत्वावर चालवण्यास घेतला आहे. त्या अनुषंगाने मागील 6 (सहा) गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस पुरवठादार, तोडणी वहातुकदार यांची बिले वेळेत अदा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका साकारली आहे. त्यामुळे कमी कालावधीत अथर्व प्रशासनाने नाव लौकिक मिळवले आहे.

    जिल्हा बँकेबरोबर झालेल्या काराराला अधीन राहून गळीत हंगाम २०१०-११ ची थकीत एफ.आर.पी. रक्कम देण्याची प्रक्रिया चालू आहे. त्या नुसार ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्याचे पडताळणी व शाहनिशा करून झालेली आहे. अश्या शेतकऱ्यांची बँक खात्यावर थकीत एफ. आर. पी. रक्कम अथर्व प्रशासनाने जमा केली आहे. तसेच ज्या ऊस पुरठादारांनी बँक खात्याचे पडताळणी झालेली नाही अश्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या कागद पत्राची पडताळणी गाव वाईज युध्द पातळीवर शेती ऑफिस कडून करण्यात येत असून आपल्या गावाला दिलेल्या तारखेला कारखाना कार्यास्थाळावर येण्याचे आवाहन अथर्व व्यवस्थापनाने केले आहे.

No comments:

Post a Comment