दौलत साखर कारखाना परिसरात माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे स्मारक व्हावे, मागणीसाठी खोराटे यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2025

दौलत साखर कारखाना परिसरात माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे स्मारक व्हावे, मागणीसाठी खोराटे यांना निवेदन

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

       दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार कै. नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांचे पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक व्हावे. या मागणीचे निवेदन नुकतेच दौलत अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांना देण्यात आले. यासाठी मानसिंग खराटे आणि सकारात्मक भूमिका घेत लवकरच याची पूर्तता करण्याबाबत अभिवचन दिल्याचे समजते.

     माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांचे दौलत सहकारी साखर कारखाना बाबतचे योगदान मोठे आहे. दौलत साखर कारखाना उभारणीतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. नॅशनल हेवी सारख्या संस्थांची त्यांनी अध्यक्षपदे भूषवली होती.  दौलत वाचवण्यासाठी त्यांचे अखेर पर्यंत प्रयत्न सुरू होते. आणि दौलत साखर कारखान्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.  पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या नरसिंगरावांचे स्मारक कारखाना कार्यस्थळावर राहावे व भावी पिढीला ते प्रेरणादायी ठरेल. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते शामराव मुरकुटे, ॲड. संतोष मळवीकर, एम. एम. तुपारे, दयानंद गावडे, सुनील शिंदे, विठ्ठल गावडे, शंकर जाधव, प्रकाश दुकळे आदींसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment