चंदगड तालुक्यातील तीन सरपंचांना दैनिक पुढारीचा 'आदर्श सरपंच पुरस्कार', गडहिंग्लज मधून ४ तर आजरा मधून २ सरपंच सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

04 August 2025

चंदगड तालुक्यातील तीन सरपंचांना दैनिक पुढारीचा 'आदर्श सरपंच पुरस्कार', गडहिंग्लज मधून ४ तर आजरा मधून २ सरपंच सन्मानित

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       दैनिक पुढारीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुढारी सरपंच सन्मान सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. गावाच्या विकासात मोलाची कामगिरी करणारे सरपंच हा पुरस्कार स्वीकारताना भारावून गेले. दैनिक पुढारी वृत्तपत्र समूह, पुढारी न्युज व पुढारी टोमॅटो एफ एम ने त्यांच्या कामाची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल सरपंचांनी कृतज्ञता व्यक्त केली. जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त सरपंचांच्या चेहऱ्यावर अभिमान व आनंदाचे हास्य यावेळी दिसत होते. 

       महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम कोल्हापूर येथील द फर्न हॉटेलच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात चंदगड तालुक्यातील तीन सरपंचांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. योगायोगाने तिन्ही पुरस्कार प्राप्त सरपंच या महिला आहेत. यात कोवाडच्या सरपंच सौ अनिता कल्लाप्पाण्णा भोगण, मुरकुटेवाडी येथील सरपंच सौ शुभांगी निंगाप्पा मुरकुटे व उत्साही येथील सरपंच सौ माधुरी संतोष सावंत भोसले यांचा समावेश आहे. 

      यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी इमारत नसलेल्या ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आल्यास तात्काळ इमारत मंजुरी देण्यात येईल, सरपंच मानधन व सरपंचांच्या इतर मागण्याबाबत लवकरच बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन दिले. महाराष्ट्र शासनाने गेल्या सात महिन्यात ३० लाख घरे मंजूर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावर्षी राज्यात आदर्श ग्राम पुरस्कार स्पर्धा घेतली जाणार असून राज्यात प्रथम क्रमांक विजेत्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे २५, २०, १५ व १० कोटींची बक्षिसे तर तालुकास्तरावरील ग्रामपंचायत ना अनुक्रमे २५ लाख, २० लाख, १५ लाख, १० लाख व ५ लाख अशी बक्षिसे देणार असल्याचे सांगितले. सरपंच परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष राणी पाटील यांनी बोलताना जल, जंगल, जमीन, जनावर यावर सरपंचांनी काम करावे. सरपंचांची कामे पाहता त्यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे.असे झाल्यास सरपंच गावाने आपल्यावर दिलेली जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतील. असे सांगितले यावेळी पुढारीचे सरव्यवस्थापक अनिल पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वराज जोशी यांनी केले. राजेंद्र मांडवकर यांनी आभार मानले. 

 

गडहिंग्लज उपविभागातून पुरस्कारासाठी निवड झालेले सरपंच 

गडहिंग्लज तालुका

श्री. बाळासाहेब उर्फ ईश्वर देसाई (ऐनापूर)

श्री. मल्लिकार्जुन आरबोळे (मुगळी)

श्री. सचिन देसाई (हिरलगे)

श्री. अनुप विकास पाटील (करंबळी)


चंदगड तालुका 

श्री. माधुरी संतोष सावंत-भोसले (उत्साळी)

श्री. अनिता कल्लापा भोगण (कोवाड)

श्री. शुभांगी निंगाप्पा मुरुकटे (मुरुकुटेवाडी)


आजरा तालुका

श्री. भारती डेळेकर (सोहाळे)

श्री. लहू वाकर (किटवडे)


पुरस्कार प्राप्त सरपंचांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment