मुंबई विशेष वृत्तसेवा
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी मतदानाच्या तारखा निवडणूक विभागाने जाहीर केल्या आहेत. ही निवडणूक ईव्हीएम वर घेण्यात येणार आहे. त्यासाठी ४ नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष निवढणुक प्रक्रियेला सुरवात होईल. २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहिर केले जाणार आहे.
नगरपरिषद व नगरपंचायतीचे निवडणुकीचे टाईम टेबल पुढील प्रमाणे ..........
नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात होणार आहे. १७ नोव्हेंबर पर्यंत नाम निर्देशन पत्र स्वीकारले जाणार असून १८ नोव्हेंबरला छाननी होईल. २१ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असून २६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्ह वाटप होईल. प्रत्यक्ष २ डिसेंबरला मतदान होईल व निकाल लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबर २०२५ रोजी जाहिर केला जाणार आहे.

No comments:
Post a Comment