चंदगड : सी एल वृत्तसेवा
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील रहिवाशी नारायण महादेव चौगुले वय ७० यांचे तुर्केवाडी येथे राहत्या घरी आज दि. ४/११/२०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता निधन झाले. ते चंदगड तालुका शेतकरी सहकारी संघाचे निवृत्त व्यवस्थापक होते.
चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार सागर चौगुले यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पश्चात, मुलगा , मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. रक्षा विसर्जन गुरुवार दि. ६ रोजी होणार आहे.

No comments:
Post a Comment