
महागाव येथे अखलाक मुजावर यांच्या घरी सुरू असलेल्या तुलसी विवाह प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ.
गडहिंग्लज : सी एल वृत्तसेवा
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील मुस्लिम कुटुंबीयांनी आपल्या घरी तुळशी विवाह साजरा करून हिंदू पंचांग प्रमाणे परंपरा चालवली आहे. महागाव येथील रहिवासी व सुप्रसिद्ध शिव व्याख्याते अकलाकभाई मुजावर यांच्या घरी हा तुळशी विवाह कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी गावातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे सर्व धर्मीय महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाहाच्या वेळी सौ वहिदा अखलाक मुजावर यानी आरती केली. यानंतर आलेल्या सर्व ग्रामस्थ व पाहुणे मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यासाठी अखलाक मुजावर व त्यांचे कुटुंबीय गेली अनेक वर्षे आपल्या घरी तुळशी विवाह मोठ्या उत्साहाने साजरा करतात. स्वतः मुस्लिम धर्मीय असूनही ते दरवर्षी आयोजित करत असलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होते. गावातील अबाल वृद्ध या कार्यक्रमाला नेहमी उपस्थिती लावतात. यंदाच्या कार्यक्रमानंतर अखलाक मुजावर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment