कोरज येथील समस्याबाबत ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, तहसीलदार यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

10 December 2025

कोरज येथील समस्याबाबत ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, तहसीलदार यांना निवेदन

 

ग्रामपंचायतीचे प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

       कोरज (ता. चंदगड) येथे अनेक समस्या जैसे थे आहेत. ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी त्वरित ग्रामपंचायतला आदेश द्यावेत अशी मागणी कोरज ग्रामस्थांनी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे निवेदनातून केली आहे. भविष्यात या सुविधा न दिल्यास आगामी सर्व निवडणुका वर बहिष्कार घालू असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.

     गावातील छत्रपती शिवाजी महाराज गल्ली ते वैकुंठ धाम स्मशान शेड, कृष्णा चांदेकर जोतिबा बेर्डे ते परशराम मिलके, मनोहर कांबळे, यमाजी यादव ते प्रल्हाद कांबळे यांचे घर या मार्गावर पथदिवे तसेच अन्य सुविधांचा अभाव आहे. काही ठिकाणी पथदिव्यांची सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

आम्ही शासनाकडे नियमित कर भरून सहकार्य करतो. मात्र ग्रामपंचायत आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ग्रामपंचायत अधिनियम व  लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत प्रत्येक नागरिकास शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत आवश्यक सेवा मिळण्याचा अधिकार आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे.

यावेळी ग्रामस्थ प्रल्हाद कांबळे, नामदेव घोगटे, भरमू कुबल, पांडुरंग नारळकर, नामदेव नारळकर, राकेश कांबळे, शिवानंद देवळी, लक्ष्मण झांबरे, तुषार कुंदेकर नितेश देवळी, अमोल कांबळे, गुरुनाथ कुबल, नंदकुमार झांबरे, सदानंद कुबल, नागोजी पाटील, पांडुरंग नारळकर, आप्पा कुबल  यांच्यासह गावातील अनके ग्रामस्थांच्या निवेदनावर सह्या आहेत.

No comments:

Post a Comment