
नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करताना संचालक मंडळ, सुकानू समिती व सल्लागार समितीचे सदस्य.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील सेवक सहकारी पतसंस्था संचालकांची बैठक नुकतीच चंदगड येथे पार पडली. या बैठकीत संस्थेच्या चेअरमन पदी दयानंद नारायण मोटूरे तर व्हाईस चेअरमन पदी अब्दुलहमीद अमीरसो मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुजय येजरे उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन दयानंद मोटूरे हे कोवाड येथील दि कोवाड मर्चंट पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन असून ग्रामसेवक पतसंस्था कोल्हापूरचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहेत. मोटूरे यांचा सहकारातील अभ्यास व योगदान पाहून त्यांची चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. मोटूरे यांच्या सहकारातील अनुभवाचा फायदा संस्थेच्या प्रगतीसाठी निश्चितपणे होईल अशी मनोगते शुभेच्छा देताना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना नूतन चेअरमन मोटूरे यांनी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन, सुकाणू समितीच्या सल्ल्याने संस्थेला प्रगतीपथावर आणण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी सुकाणू समिती सदस्य रवींद्र पाटील, सल्लागार समिती सदस्य श्रीधर भोगण, माजी चेअरमन नंदकुमार गावडे, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील, शाखा चेअरमन सतीश माने, स्नेहल वाघमारे, राजेश काटकर, रोहिदास पाटील, विठोबा मंगूरकर, पांडुरंग मेंगाने, लक्ष्मण सुतार, गायकवाड, कमलाकर, व्यवस्थापक गणपत सावंत, शाखा व्यवस्थापक ईश्वर आवडण, क्लार्क सुधीर लांडे, सौ वैशाली गडकरी आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment