राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चंदगडचा डंका – झोया मुल्ला द्वितीय तर संगीता यमकर उत्तेजनार्थ - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2025

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चंदगडचा डंका – झोया मुल्ला द्वितीय तर संगीता यमकर उत्तेजनार्थ

 

झोया मुल्ला

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    खेडूत शिक्षण मंडळाचे संस्थापक सदस्य व माजी चेअरमन र. भा. माडखोलकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत चंदगड मधील विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करून शाळेचा झेंडा उंचावला आहे.

संगीता यमकर

    न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या कु. झोया मुल्ला हिने द्वितीय क्रमांक पटकावत आपली वक्तृत्वकला राज्यपातळीवर ठसवली. तर दि न्यू इंग्लिश स्कूलच्या कु. संगीता यमकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत प्रभावी सादरीकरणाने परीक्षकांची दाद मिळवली. 

या उल्लेखनीय यशाबद्दल शालेय समितीचे चेअरमन ॲड. एन. एस. पाटील, प्राचार्य आर. पी. पाटील व उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment