वक्तृत्व कला व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन - प्र. प्रा. डॉ. एस. डी. गोरल, स्व. र. भा. माडखोलकर यांच्या १०० व्या जयंतीदिनी वक्तृत्व स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2025

वक्तृत्व कला व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन - प्र. प्रा. डॉ. एस. डी. गोरल, स्व. र. भा. माडखोलकर यांच्या १०० व्या जयंतीदिनी वक्तृत्व स्पर्धा


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        "वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व यांचा एकमेकांची परस्पर संबंध असतो. उत्तम संभाषण साधता येणे ही आजच्या काळातील एक महत्त्वाची गरज बनली आहे. व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणून वक्तृत्व कलेचा उल्लेख केला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी चौफेर वाचन केले पाहिजे. व्यासंग वाढवला पाहिजे आणि या कलेच्या बळावर जीवनात यशस्वी झाले पाहिजे. वक्त्याजवळ नेहमीच प्रबळ आत्मविश्वास असतो हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या कलेची शास्त्रोक्त पद्धतीने साधना केल्यास त्याचे भविष्य निश्चितच उज्वल बनेल यात शंका नाही." असे प्रतिपादन डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

    स्व. र. भा. माडखोलकर सरांच्या १०० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक समन्वयक प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन ए. डी. कांबळे यांनी केले. डॉ. एस. एन. पाटीलडॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. आर. के. तेलगोटेडॉ. एन. के. पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. एल. एन. गायकवाड यांनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले. या वेळी प्राध्यापक, कर्मचारी, पालक व विद्यार्थांची लक्षणीय उपस्थिती होती. स्पर्धेसाठी "कुणाच्या डोक्यात? शेती धोक्यात?", ब्रेकिंगच्या गदारोळात पत्रकारितेची हत्या, नवे तंत्रज्ञान- बदलती आव्हाने, र. भा. माडखोलकर सरांचे सामजिक व शैक्षणिक योगदान, अभिजात मराठी भाषा: माझा अभिमान असे विषय ठेवण्यात आले होते. अनुक्रमे पाच, चार, तीन व एक हजाराची दोन बक्षीसे ठेवण्यात आली होती. उद्योजक सुनील काणेकर, माजी प्राचार्य डॉ. एस.पी. बांदिवडेकर, प्रा. डी.के. कदम, प्रा डॉ. एस. डी. गोरल, डॉ. एस. डी. गावडे यांनी बक्षीसे पुरस्कृत केली होती. या स्पर्धेत अनुक्रमे अमृता सरगर, जोया मुल्लाऋतुजा कानडे, क्रांती पाटील व संगीता यमकर यांनी यश मिळविले. परीक्षक म्हणून डॉ. आर. ए. घोरपडे, के. डी. बारवेलकर, व्ही. ए. पाटील यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment