चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजचा सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व शुभेच्छा समारंभ शुक्रवार (ता. १६) व शनिवार (दि. १७ जानेवारी २०२६ रोजी गुरुवर्य एस. एन. पाटील बहुउद्देशीय सभागृह चंदगड येथे आयोजित केल्याची माहिती प्राचार्य आर. पी. पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जी. एस. पाटील अध्यक्षस्थानी असतील. तसेच कवठेमहाकाळ येथील प्रसिद्ध लेखक व कवी नितीन चंदनशिवे, प्राध्यापिका सौ. उज्वला देसाई, शालेय समितीचे चेअरमन व खेडूत शिक्षण संस्थेचे ऑडिटर ॲड. एन. एस. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर खेडूत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, सचिव एम. एम. तुपारे, खजिनदार संचालक ए. व्ही. सुतार, संचालक आर. पी. पाटील, एम. बी. पाटील, एन. के. पाटील, एस. एम. फर्नाडीस, बी. बी. पाटील, आर. बी. पाटील, व्ही. डी. सडेकर, के. एस. माळवे, एस. व्ही. मुरकुटे, माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजता रांगोळी प्रदर्शन व उद्घाटन होईल सकाळी ९ वाजता स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण शुभेच्छा समारंभ होईल. शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते १२ या वेळेत न. भु. पाटील जुनिअर कॉलेज चंदगडचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दुपारी १ ते ४ या वेळेत तीन इंग्लिश स्कूलचा विविध गुणदर्शन कार्यक्रम होईल. सर्वांनी या कार्यक्रमासाठी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन विद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी केले.

No comments:
Post a Comment