चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
येथील सॅम क्रिकेट क्लब ॲण्ड फिशिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच प्रजासत्ताक दिनानिमित्त तालुका मर्यादित गायन स्पर्धा सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ११ या वेळेत महात्मा गांधी वस्तीगृहाच्या पटांगणात आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेत कराओके साऊंड सिस्टीमवर देश भक्तीपर आधारीत हिंदी, मराठी भाव गीत व चित्रपट संगीतातील गीतांची स्पर्धा असून स्पर्धेसाठी ११०००, ७०००, ५०००, ३००० अशी अनुक्रमे बक्षीसे आहेत. इच्छुकांनी ९४२१२८९५५८ व ८९७५९५५०५९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment