चंदगड पंचायत समिती शिक्षण विभाग मार्फत मिशन अंकुर - प्रशिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2026

चंदगड पंचायत समिती शिक्षण विभाग मार्फत मिशन अंकुर - प्रशिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे उत्साहात

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड पंचायत समिती शिक्षण विभाग मार्फत मिशन अंकुर -प्रशिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे उत्साहात संपन्न झाले. कोल्हापूर जि. प शिक्षण विभाग मार्फत इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्च -२०२६ मध्ये अंकुर परीक्षा होणार आहे.

    याअनुषंगाने पंचायत समिती चंदगड मार्फत चंदगड तालुक्यातील प्राथमिक शाळेतील पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शक चंदगड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी व प्रशिक्षण केंद्र संचालक सुनित चंद्रमणी यांनी विद्यार्थी विकासाचा पाया पहिली, दुसरी विद्यार्थी असून त्यांना सर्वंकष घडवणारे वर्ग शिक्षक खरे कलाकार आहेत. यासाठी अंकुर परीक्षा महत्वाची असून त्यादृष्टीने शिक्षकांनी मुलांना घडवणे महत्वाचे असलेचे सांगितले. 

    साधनव्यक्ती प्रविण साळुंखे यांनी अंकुर परीक्षेच्या यशाची गुरुकिल्ली विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केली. मोहन सुतार यांनी अंकुर परीक्षेचे गुणांकन विद्यार्थी, वर्ग, शाळा व केंद्र पातळी वर कसे केले जाते ते स्पष्ट केले. संभाजी चिंचणगी यांनी अंकुर परीक्षा च्या पेपरची रचना सांगितली. यावेळी साधन व्यक्तींनी मुलभूत साक्षरता, २०२०चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अंकुर आरंभिक साक्षरता संवर्धन कार्यक्रम, निपुण भारत अभियान यांमध्ये शिक्षकाची भूमिका स्पष्ट केली. 

    चंदगड तालुक्यातील जि. प. शाळेतील पहिली व दुसरीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाचे नियोजन पंचायत समिती चंदगडचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी केले होते. प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार, नामदेव माईनकर यांनी प्रयत्न केले. यावेळी तालुक्यातील केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. प्रशासकीय सुचना व आभार सुनित चंद्रमणी यांनी मानले.

No comments:

Post a Comment