![]() |
| खासदार शाहू महाराज |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील कागणी रोड पासून गौळदेव टेकडी कडे जाणारा रस्ता स्वातंत्र्यानंतरही कित्येक वेळा मागणी करूनही दुर्लक्षित राहिला होता. या रस्त्यासाठी अखेर लोकराजा राजश्री शाहू छत्रपती यांचे वंशज विद्यमान खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या फंडातून निधी मिळाला. यामुळे अखेर या रस्त्यापैकी १८५ मीटर लांबीच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम मार्गी लागले. खासदार शाहू महाराज यांच्या फंडातून या कामी १० लाख रुपयांचा निधी मिळाल्याचे समजते. या कामी श्री कलमेश्वर विकास सेवा संस्थेचे चेअरमन अशोक रामू पाटील तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ छाया जोशी उपसरपंच संभाजी पाटील व कमिटीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले.
![]() |
| कालकुंद्री येथील गौळदेव रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित सरपंच उपसरपंच सेवा संस्था चेअरमन व ग्रामस्थ |
शुक्रवार दि. ९/१/२०२६ रोजी या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, चेअरमन अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ गीता पाटील, माजी सरपंच अरविंद सोनार, एस. के. मुर्डेकर, सुरेश नाईक, प्रकाश कोकीतकर, गजानन मोरे, गंगाराम तेऊरवाडकर, पांडू गायकवाड व ग्रामस्थांची उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment