अवैध प्रकार, शांतता बिघडवणाऱ्यावर कडक कारवाई करणार - जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीत चंदगड येथे पोलीस पाटील यांची बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2026

अवैध प्रकार, शांतता बिघडवणाऱ्यावर कडक कारवाई करणार - जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीत चंदगड येथे पोलीस पाटील यांची बैठक

चंदगड : जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता मार्गदर्शन करताना


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समिती निवडणुकीत कोणताही अवैध प्रकार खपवून घेतला जाणार नाही तसेच शांतता बिघडवणाऱ्या वर कडक कारवाई करू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी दिला. ते चंदगड येथे तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोलत होते.

चंदगड तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अमृत देसाई यांनी जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कडलगेचे पोलीस पाटील राजेंद्र कुमार पाटील यांनी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांचे स्वागत केले. 

यावेळी योगेशकुमार गुप्ता म्हणाले, चंदगड नगरपंचायत निवडणुकीप्रमाणे आत्ताच्या निवडणुका ही शांततेत पार पाडाव्यात. नगरपंचायत निवडणूक चंदगड पोलीस ठाण्याला शांतता स्थापन करण्यात चांगले यश मिळाले. हे कार्य कौतुकास्पद आहे.

जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, पोलीस उपनिरीक्षक शीतल धविले, आकाश भिंगारदेवे, चंदगड तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अमृत देसाई, उपाध्यक्ष संदीप बांदेकर, महिला पोलीस महिला पोलीस पाटील संघटनेच्या उपाध्यक्ष माधुरी कांबळे, यांच्यासह अन्य गावांचे पोलीस पाटील तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment