चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
गोरगरिब जनतेच्या हाकेला रात्री - अपरात्री धावून जाणारे कुटुंब म्हणून पंचक्रोशीतील पाटील कुटुंबियांनी ओळख निर्माण केली आहे. या ओळखीतूनच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अडकूर जिल्हा परिषद गटातून सौ. अलकनंदा अंबादास पाटील याना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या प्रचाराला मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत आहे.
अडकूर जि.प.उमेदवार सौ. अलकनंदा अंबादास पाटील यांनी कानूर, अडकूर व त्यांचे माहेर असलेले म्हांळूगे गावातुन पंचक्रोशीमध्ये प्रचार करत असताना त्यांना आपुलकीतून मतदारांच्यातून प्रतिसाद मिळत आहे. अंबादास पाटील हे चंदगड या तालुक्यात एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.
जशी माजी आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांचे एकनिष्ठ आहेत. या तीन तालुक्यात राजेश पाटील यांनी आपली ओळख निर्माण केली. त्याच प्रकारे अंबादास पाटील व त्यांच्या पत्नी यांची कानूर, भोगोली, म्हांळुगे, शिरोली, अडकूर भागात ही त्यांना विकास कामांच्या कार्याला ओळखणारा युवा व जेष्ठ वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यातून त्यांना या निवडणुकीत मतांच्या स्वरुपात मदत मिळेल असा विश्वास आहे.

No comments:
Post a Comment