तेऊरवाडी येथे रामनवमीनिमित्त गुरुवारी २६ रोजी निकाली कुस्त्यांचे मैदान - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2026

तेऊरवाडी येथे रामनवमीनिमित्त गुरुवारी २६ रोजी निकाली कुस्त्यांचे मैदान

  


तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा 

   तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे खास रामनवमीनिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही निकाली कुस्त्यांची जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी कोवाड नेसरी रोडवर दुपारी ४.०० वाजता होणाऱ्या मैदानाचे पूजन पै. लक्ष्मण भिंगुडे (अध्यक्ष श्रीराम तालीम मंडळ), सुबराव लक्ष्मण पाटील (उपाध्यक्ष), शिवाजी धोंडीबा पाटील, तुकाराम कृष्णा पाटील (व्हा. चेअरमन सेवा सोसायटी) यांच्या हस्ते होणार आहे. 



  मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती पै‌. कुमार पाटील (मोतीबाग तालीम कोल्हापूर, पै. विष्णू जोशीलकर यांचा पठ्ठा) विरुद्ध पै. कामेश पाटील कंग्राळी (कर्नाटक कंठिरव) यांच्यात होणार असून याशिवाय अनुक्रमे पै. अध्ययन एडके (कवठेपिरान) विरुद्ध पै. ओमकार पाटील (मोतीबाग), पै प्रेम (कंग्राळी, कर्नाटक चॅम्पियन) विरुद्ध पै. सचिन महागावकर (मोतीबाग), पै. विक्रम शिनोळी (महाराष्ट्र चॅम्पियन) विरुद्ध पै. दत्ता शिंदे (मोतीबाग), पै. पार्थ पाटील (कंग्राळी खुर्द, कर्नाटक चॅम्पियन) विरुद्ध पै. विनायक वास्कर (मोतीबाग), पै. रोहित चव्हाण (कवठेपिरान) विरुद्ध ओमकार पाटील राशिवडे (महाराष्ट्र चॅम्पियन) तर दोन जंगी मेंढ्यासाठी अनुक्रमे पै. सतबा भिंगुडे तेऊरवाडी विरुद्ध पै. ओमकार खादरवाडी आणि तेजस पै. लोहार राशीवडे विरुद्ध पै. सचिन शिरगुप्पी अशा एकूण ५० पेक्षा अधिक काटाजोड कुस्त्या कुस्ती शौकिनांसाठी पर्वणी ठरणार आहेत.

 यावेळी पंच म्हणून प्रकाश दळवी, महादेव पाटील, राजाराम पाटील, देवजी कुट्रे, अनिल मोरे आदी काम पाहणार आहेत. कुस्ती शौकिनांनी मैदानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन रामराव गुडाजी, हेमंत पाटील, रामराव भिंगुडे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment