तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा
सन 2025 या वर्षात क्षयरोगमुक्त (TB) अभियान अंतर्गत राबविलेल्या मोहिमेमध्ये विविध निर्देशांकामध्ये चंदगड तालुका आरोग्य विभाग जिल्ह्यात प्रथम आला आहे. चंदगड तालुका आरोग्य विभागाने क्षयरोग विषयक विविध बाबीत रुग्णांचे एक्स-रे व थुंकी नमुना तपासणी, रुग्ण लवकर शोधून उपचार देणे व उपचाराचा सक्सेस रेट, तसेच मृत्यू दर कमी करणे यामध्ये प्रभावी काम केलेले आहे. 2025 मध्ये क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत राबविलेल्या मोहिमे अंतर्गत तालुक्यातील 60 ग्रामपंचायती क्षय मुक्त झालेल्या आहेत.
तसेच शंभर दिवशीय क्षयरोग अभियान अंतर्गत अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र अडकूर यांना सदरील मोहिमेमध्ये विशेष काम केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाला आहे.
क्षयरोग विषयक लक्षणे जशी की सततचा खोकला, संध्याकाळी येणारा ताप, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, तसेच भूक न लागणे इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी जेणेकरून योग्य निदान व उपचार केल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी दिली. डॉ. सोमजाळ यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्य विभागाने उत्कृष्ठ कामगिरी केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
No comments:
Post a Comment