कालकुंद्रीच्या सरपंच सौ. छाया जोशी 'राष्ट्रहित आदर्श सरपंच' पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2026

कालकुंद्रीच्या सरपंच सौ. छाया जोशी 'राष्ट्रहित आदर्श सरपंच' पुरस्काराने सन्मानित

  

सरपंच सौ. छाया जोशी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

        कालकुंद्री (ता. चंदगड) गावच्या सरपंच सौ छाया राजाराम जोशी यांना 'राष्ट्रहित आदर्श सरपंच पुरस्कार' देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. 'राष्ट्रीय लोक गौरव सन्मान परिषद २०२६' अंतर्गत पणजी- गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 'लक्षवेधी पुरस्कार वितरण' सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पणजी गोवा येथे 'राष्ट्रहित आदर्श सरपंच' पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना कालकुंद्री गावच्या सरपंच सौ छाया राजाराम जोशी 

      आर्ट्स, टुरिझम अँड कल्चरल फेस्टिवल समिती गोवा आणि महाराष्ट्र यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन्मान पुरस्कार वितरण प्रसंगी मा. श्रीपाद नाईक (केंद्रीय ऊर्जामंत्री भारत सरकार), मा. सदानंद तानावडे (राज्यसभा खासदार), डॉ. उल्हास प्रभुदेसाई (जेष्ठ साहित्यिक), मा. रोडाल्फो एल. फर्नांडिस (आमदार गोवा),  मा. प्रमोद कामत (जिल्हा परिषद अध्यक्ष सिंधुदुर्ग), अभिनेते अभय खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच सौ छाया जोशी यांनी आपल्या सरपंच पदाच्या काळात सेवाभाव, समर्पण वृत्ती व संघर्ष करीत समाज हिताच्या दृष्टीने केलेल्या उल्लेखनीय प्रेरणादायी योगदानाची दखल पुरस्काराच्या निमित्ताने संस्थेने घेतली आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment