चंदगड : सी एल वृत्तसेवा
एम. एम. जोशी- कोडकणी आय सेंटर अयोध्या नगर- बेळगाव यांच्या वतीने केदारनाथ कॉम्प्लेक्स, बेळगाव- वेंगुर्ले रोड, माणगाव फाटा (ता. चंदगड) येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत होणाऱ्या या शिबिरात तज्ञ डॉक्टरांमार्फत कॉम्प्युटराईज्ड संपूर्ण डोळे तपासणी यात रातांधळेपणा, डोळे लाल होणे किंवा दुखणे, डोळा तिरळा होणे, चष्म्याच्या नंबर काढणे, लहान मुलांचे दृष्टी दोष, मोतीबिंदू रोबोटिक उपचार, बीपी किंवा डायबेटीस रुग्णांसाठी मागचा पडदा तपासणे, मोतीबिंदू ऑपरेशन या सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. वरील लक्षणे किंवा डोळ्यासंदर्भात कोणतेही दोष असलेल्या गरजूंनी शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन जोशी- कोडकणी आय सेंटर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment