| संग्रहित छायाचित्र |
वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त चंदगड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची बैठक उद्या बुधवार दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठिक ११ :३० वा. क्रिस्टल हाऊस, नवी मुंबई जि.ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. सदर बैठकीस वन खात्याचे प्रमुख संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत राहणार आहेत. तरी चंदगड विधानसभा मतदारसंघातील वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे पीडित शेतकरी बांधवांनी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment