उपोषण करणाऱ्या दौलत कारखान्याच्या कामगाराची प्रकृती खालावली, गडहिंग्लज येथे उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2026

उपोषण करणाऱ्या दौलत कारखान्याच्या कामगाराची प्रकृती खालावली, गडहिंग्लज येथे उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल

 

निवृत्ती धाकलू चौकुळकर

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

येथील तहसील कार्यालयासमोर मागील सहा दिवसापासून सुरू असलेल्या हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत - अथर्व साखर कारखान्याच्या कामगारांचे आमरण उपोषण सुरूच असून यामधील एका कामगाराची प्रकृती मंगळवारी सायंकाळी खालावली. यानंतर चंदगड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रश्मी माळगावकर यांनी उपोषण करणाऱ्या कामगारांपैकी बिजूर (ता. चंदगड) येथील कामगार निवृत्त निवृत्ती धाकलू चौकुळकर (वय ५५) यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री दाखल केले. कामगार व दौलत अथर्व प्रशासन यांच्यात अद्यापही तोडगा निघाल्याने आंदोलनाची परिस्थिती चिघळत आहे.

उपोषण स्थळी चंदगड पोलिसांचाही कडक बंदोबस्त आहे. आमरण उपोषणाचा मंगळवार हा सहावा दिवस आहे. कामगार प्रतिनिधी व कारखाना प्रशासन अधिकारी यांच्यात अद्याप एकही बैठक झाली नाही, कामगारही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

No comments:

Post a Comment