चंदगड / प्रतिनिधी दि. ०४-०४-२०२६
भोगोली (ता. चंदगड) येथील जैन मंदिरांच्या बाबतीत चंद्रकांत पाटील (रा. कोल्हापूर (सध्या पुणे) या व्यक्तीने सोशल मिडीया फेसबुक पेजवरुन चूकीची व आक्षेपार्ह माहिती दिली आहे. तसेच जैन साधू संताच्या पासून गावातील सत्य परिस्थिती लपवून चूकीची माहिती देऊन त्यांचे देखील व्हीडीओ बनवून व्हायरल केलेले आहेत, ही एक प्रकारे त्यांची देखील फसवणूक आहे.
त्याचबरोबर यातून चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी शिवाजीराव पाटील यांच्या विषयीही मानहानीकारक प्रतिक्रिया दिली आहे. वरील सर्व बाबींमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन हिंदु व जैन सामाजामध्ये संभ्रम निर्माण होऊन वादंग निर्माण होऊ शकतो. तरी या समाज विघातक कृत्याची गंभीर दखल घेऊन त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी भोगोली ग्रामस्थांनी पोलीस निरिक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनावर जगन्नाथ गावडे, निवृत्ती गावडे, विष्णू गावडे, देवजी गावडे, शाहू तेजाम, रामकृष्ण सलाम, रामू गावडे, रानबा गावडे, बाबू गावडे, रमेश चौगुले, पुंडलिक गावडे, रवींद्र गावडे, विजय गावडे, महादेव पाटील, जनकाप्पा पाटील, अर्जुन गावडे, रामा गावडे, संजय गावडे, रामकृष्ण शिरोडकर, अशोक दळवी, एकनाथ शिरोडकर, विनायक गावडे, गोपाळ गावडे, शंकर गावडे, विलास सलाम, सिताराम गावडे, नागोजी गावडे, पांडुरंग पिळणकर, मारुती पाटील व शिवाजी चव्हाण यांच्या सह्या आहेत.

No comments:
Post a Comment