चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील दाटे (ता. चंदगड) येथे हलकर्णी मंडलातील सकल हिंदू समाजाच्यावतीने सोमवार ६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संमेलनापूर्वी दुपारी ३.३० वाजता दाटे ग्राम प्रदक्षिणा करणारी भव्य शोभायात्रा काढणार आहे. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक वातावरणात ही दिंडी पार पडणार आहे.
या संमेलनासाठी धर्माचार्य म्हणून नूल तालुका गडिंग्लज येथील सकल हिंदू समाजातर्फे ६ एप्रिलरोर्जी सायंकाळी ४.३० वाजता आयोजन धर्माचार्य भगवान गिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रमुख वक्ते म्हणून कौशिक पाध्ये मार्गदर्शन करतील. दाटे, बेळभाट, हल्लारवाडी, करंजगाव, नरेवाडी, गुडेवाडी, वरगाव, धुमडेवाडी, तावरेवाडी, हलकर्णी, जंगमहट्टी, कलिवडे, किटवडे, आंबेवाडी, सदावरवाडी आदी गावांतील नागरिक या संमेलनात सहभागी होतील.
"एकत्र या, संघटित व्हा आणि शक्ती वाढवा" हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनातून समाजातील बंधुभाव, परस्पर सहकार्य आणि सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ करण्याचा प्रयत्न होत आहे.

No comments:
Post a Comment