
कोल्हापूर : संतोष नांगरे यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र सुपूर्द करताना ॲड. ए बी वाघ. शेजारी अन्य पदाधिकारी.
चंदगड : प्रतिनिधी
चंदगड येथील संत रोहिदास चर्मकार समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी चंदगड येथील व्यवसायिक संतोष लक्ष्मण नांगरे (चंदगड) यांची तर उपाध्यक्षपदी मोनेश्वरी चव्हाण (शिनोळी) यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी यासह अन्य १५ संचालकांच्या निवडी करण्यात आल्या. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये खजिनदार म्हणून विजय किणेकर (यशवंतनगर), सेक्रेटरी संतोष शिंदे (सत्तेवाडी) यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला रोहिदास समाजाचे गंगाराम शिंदे, अमोल नांगरे, सूर्यकांत माने, शामराव चव्हाण, राजू चव्हाण, परशुराम पवार, सुरेश यादव, विजय पवार, परशराम पवार, विलास चव्हाण यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
या संस्थेला नुकतेच कोल्हापूर येथील सहाय्यक संस्था निबंधक कार्यालयातून नोंदणी पत्र देण्यात आले. अध्यक्ष संतोष नांगरे यांच्यासह नूतन पदाधिकारी यांनी सदरचे पत्र स्वीकारले. त्याबाबत संतोष नांगरे म्हणाले की``तालुक्यातील चर्मकार व्यवसायातील सर्व घटकांना एकत्र करून व्यावसायिक व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक असल्याचे सांगितले.``
No comments:
Post a Comment