गुडवळे खालसा येथे १० तांब्याचे हंडे, १ बंब, २ कळशा चोरीला, गावातील अकरा जणांना सव्वा लाखाचा फटका - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2026

गुडवळे खालसा येथे १० तांब्याचे हंडे, १ बंब, २ कळशा चोरीला, गावातील अकरा जणांना सव्वा लाखाचा फटका

  

संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     गुडवळे खालसा (ता. चंदगड) येथे एकाच रात्री अकरा घरातील अकरा तांब्याचे हंडे, बंब व दोन कळशा चोरट्यानी चोरून नेल्या. यामुळे सदर ग्रामस्थांना सुमारे लाख रुपयांचा फटका बसला. सदर घटना गुरुवारी (दि. २)  मध्यरात्री घडली. याबाबत ग्रामस्थांनी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बाबू रामा कांबळे, उत्तम रामजी गावडे, आनंद विष्णू केसरकर, अजय महादेव गावडे, तानाजी नागोजी बांदिवडेकर, सतीश यशवंत गावडे, नामदेव शंकर गावडे, दत्तू पांडुरंग गावडे यांच्या घराच्या मागे व समोरील अंगणात अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी ठेवण्यात आलेले हंडे चोरून नेण्यात आले. यशवंत धाकू बांदिवडेकर व अर्जुन बाबू बांदिवडेकर यांचा प्रत्येकी कळशी व तांब्याचा हंडा चोरीला गेला.

    तर तुकाराम बाबाजी धुरी त्यांच्या घराच्या पाठीमागे ठेवण्यात आलेला तांब्याच्या बंबावर चोरट्यानी डल्ला मारला. या सर्व ग्रामस्थांच्या घराच्या पाठीमागील खोलीत ठेवण्यात आलेल्या या वस्तू नेण्यात आल्या. तर काही ग्रामस्थांच्या पाठीमागील कडी काढून हे साहित्य लंपास केले आहे.

    तालुक्यातील सुमारे २५ हून अधिक गावांमध्ये अशा चोऱ्या यापूर्वी झाले आहेत. चंदगड पोलिसांनी ठोस मोहीम राबवून या चोरांच्या टोळीचा छडा लावावा अशी मागणी अनेक दिवसापासून लागून आहे.

No comments:

Post a Comment