
कुदनूर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची पै. प्रथमेश (कंग्राळी) विरुद्ध पै. गुरु (बानगे) यांची कुस्ती लावताना मान्यवर
कुदनूर : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथे हनुमान जयंती निमित्त श्री हनुमान तालीम मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित कुस्ती मैदानातील द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत कंग्राळी (ता. बेळगाव) च्या पै. पृथ्वीराज पाटील यांने बानगे च्या पै. सुरेश नरके याला घिस्सा डावावर आस्मान दाखवले. प्रथम क्रमांकाची पै. प्रथमेश हट्टीकर (कंग्राळी) विरुद्ध पै. गुरु जोंधळेकर (बानगे) व चौथ्या क्रमांकाची भूमिपुत्र (मुतगा) विरुद्ध सोहम सुतार (बानगे) या कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या. क्रमांक तीनच्या लढतीत पै. निखिल पाटील (कंग्राळी) यांने पै. निलेश हिरुगडे (बानगे) याच्यावर घिस्सा डावावर विजय मिळवला. पाचव्या क्रमांक पाचच्या कुस्तीत पै. सुमित (कडोली) याने पै. श्री शिंदे (बानगे) निकाल डावावर विजय मिळवला.
प्रेम सुरुवातीस श्री हनुमान प्रतिमा व मैदानाचे पूजन मारुती खामकर, शंकर आंबेवाडकर, मारुती खंदाळे यांच्या हस्ते झाले. मैदानात ज्ञानेश्वर (तुर्केवाडी), सतबा भिंगुडे, वेदांत पाटील, अतुल पाटील, चेतन पाटील, संग्राम पाटील (तेऊरवाडी), आकाश पुजारी, अविनाश पाटील, आदिराज पाटील (निट्टूर), सौरभ मोटर, जीवन गावडे,आदर्श, उत्कर्ष (दाटे), विराज पाटील (कालकुंद्री) आदी पैलवानांनी आपल्याला प्रतिस्पर्ध्यांवर चटकदार विजय मिळवले. ३-४ कुस्त्या बरोबरीत सोडवल्याने कुस्ती शौकिनांनी नाराजी व्यक्त केली.
मैदानात मुदगा व कंग्राळी या कर्नाटकातील पैलवानांच्या कुस्ती दरम्यान समर्थकांनी गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. नेहमीप्रमाणे यावर्षीही कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील पैलवान मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. महत्त्वाच्या कुस्त्यांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील पैलवानाने आपले वर्चस्व राखले. पंच म्हणून भैरू पाटील, पुंडलिक आंबेवाडकर, कांता शहापूरकर, लक्ष्मण भिंगुडे, प्रकाश दळवी आदींनी काम पाहिले. यावेळी पंस. सदस्य मधुकर आंबेवाडकर, पी. बी. पाटील, एम. जे. पाटील, बी. जी. जाधव, बाळकृष्ण नागरदळेकर, नामदेव कोकितकर, बी. एस, मुतकेकर, वैजनाथ हेब्बाळकर, सरपंच उपसरपंच, सदस्य आदी उपस्थित होते.
धावते समालोचन पी. के. पाटील (कंग्राळी) यांनी केले. सी. बी. निर्मळकर व शंकर कोरी यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय आवळे (सोनाळी) यांच्या रणहलगी पथकाने मैदानात चैतन्य निर्माण केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी जि. प. सदस्य शंकर आंबेवाडकर, सिद्राम गुंडकल, दयानंद जाधव, अर्जुन हेब्बाळकर, मोहन खामकर, महादेव ओऊळकर,आदींसह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कुस्त्या पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील शौकिनांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.
No comments:
Post a Comment