कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री, ता. चंदगड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी भीम क्रांती सांस्कृतीक युवा मंच यांच्यावतीने दुपारी १२ वाजता इयत्ता पहिली ते सातवी साठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रोख बक्षीसे अनुक्रमे रुपये ३००१, २००१, १५०१, १००१, ७०१ व चषक अशी बक्षिसे असून स्पर्धेसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, त्यागमूर्ती माता रमाई हे विषय ठेवण्यात आले आहेत. गुरुवार दिनांक ९ एप्रिल २०२६ पासून खुल्या हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रोख बक्षीशे रुपये ७००१, ५००१, ३००१ व चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार असून यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक ए. डी. कांबळे (माडखोलकर महाविद्यालय चंदगड) हे आहेत. यावेळी पंचायत समिती सभापती विलास नाईक, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, तसेच सर्व नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी रात्री ९.०० वाजता स्वरांगण म्युझिशियन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व स्पर्धा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन भीमक्रांती सांस्कृतिक युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment