चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी रामपूर (ता. चंदगड) येथील बाबुराव वर्पे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी बाबुराव वर्पे यांनी नाम. मुश्रीफ यांचा शाल, श्रीफळ,गुच्छ देऊन सत्कार केला.
पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री. वर्पे यांनी आपल्या बत्तीस वर्षे सेवा काळातील शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. आपल्या प्रेरणेने भटक्या व वंचित समाजातील गोरगरीबांची मुले शिक्षण प्रवाहात असून अनेक मुले उच्चपदस्थ झालेचे सांगितले. वि.मं.येणेचवंडी शाळा व मौजे जट्टेवाडी शाळेला जिल्हा व राज्यस्तर गुणगौरव मिळवून देणेत मोलाचे योगदान दिलेचे सांगितले. यावेळी शाळा व समाजात राबवलेले विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, भटक्यांची शिक्षण परिषद यांचे विशेष कौतुक केले. घरच्या अंगणातील विविध फुलझाडे, औषधी वनस्पती यांची माहीती घेतली. शासनस्तरावर आपल्या कार्याची निश्चित दखल घेतली जाईल असे नामदार हसन मुश्रीफ म्हणाले. यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी बाबुराव वरपे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी माजी जि. प. सदस्य भरमणा गावडा, सौ. शारदा वरपे, सायली वरपे व साहील वरपे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment