चंदगड / प्रतिनिधी
अडकूर जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेले सौ. राजश्री लक्ष्मण गावडे यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्याअर्थ व कृषी समिती सदस्य पदी शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. या निवडीवेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील चार समिती सभापतीच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव यांनी या निवडीत प्रक्रियेची माहिती सभागृहाला दिली.
सौ. राजश्री लक्ष्मण गावडे यांच्या निवडीबद्दल अडकूर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण गावडे व विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अडकून जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांच्या या विजय मुळे त्यांची निवड प्रक्रिया शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष तानाजी पाटील चार समिती सभापतीच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
या निवडी वेळी सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव यांनी निवड प्रक्रियेची सौ. राजश्री लक्ष्मण गावडे यांना पत्र देऊन निवड झाल्याची माहिती दिली.
सौ. गावडे यांच्या निवडीमुळे अडकूर मतदार संघामधील विकास कामांना गती मिळणार आहे. त्यामुळे त्यामुळे सौ राजश्री गावडे यांचा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आहेत.

No comments:
Post a Comment