![]() |
| चंदगड : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. संतोष मळवीकर. शेजारी सभापती विलास नाईक, नितीन पाटील, भरमाना गावडे, ॲड. एन. एस. पाटील, शंकर मनवाडकर, पांडुरंग बेनके, संज्योती मळवीकर आदी. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यात सर्वच भागामध्ये रानडुक्कर, गवी रेडे व अन्य वन्य प्राण्यांकडून अतोनात शेती पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची शेती पड ठेवावी लागत आहे, यामुळे संतापलेल्या चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चाला तहसीलदार राजेश चव्हाण चंदगडचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड पाटणे च्या वनक्षेत्रपाल शितल पाटील सामोरे गेले.
निवेदनातून रानडुकरांनाठार मारायची परवानगी द्या, वन्यप्राण्यामुळे होणारी नुकसानभरपाई पंधरा दिवसात द्या, यासह अन्य मागण्या केल्या. मोर्चाला जिल्हास्तरीय एकही अधिकारी उपस्थित राहिले नसल्याने तहसीलदार कार्यालयासमोर घोषणा देत निषेध व्यक्त केला.
यानंतर कोल्हापूर विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी 22 रोजी चंदगड येथे उपस्थित राहून समस्या जाणून घेण्याची घेण्याचे आश्वासन दिले यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सोमवारी (दि. १३) सकाळी पंचायत समिती कार्यालयाजवळ तालुक्यातील सर्व शेतकरी एकत्र आले. यानंतर धर्मवीर संभाजी चौक, रविवार पेठ, रवळनाथ गल्ली नंतर कचेरी रोड या मार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा गेला. मोर्चामध्ये विविध घोषणा देत तसेच विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन शेतकरी, महिला सहभागी झाल्या होत्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळवीकर,बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, तालुका पंचायत सभापती प्रा. विलास नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. एन. एस. पाटील, कोल्हापूर जि. प. शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती भरमाना गावडे, शंकर मनवाडकर, उपसभापती संज्योती मळवीकर, प्रा. सुखदेव शहापूरकर, माजी जि. प. सदस्या बाळासाहेब हळदणकर, शेखर गावडे, विष्णू गावडे, माजी सभापती जगन्नाथ हुलजी, गजानन तांबाळकर, संदीप पाटील, विठ्ठल गावडे, कृष्णा पाटील, तालुका पंचायत सदस्य मधुकर आंबेवाडकर, पांडुरंग बेनके यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.
सौर कुंपण मोफत, पंधरा दिवसात नुकसान भरपाई व पिकांचे अति नुकसान करणाऱ्या रानडुकराना मारण्याचा परवाना द्या, दोन लाख रुपये कर्जमाफी करा, काजू क्षेत्राला हेक्टरी ५० हजार अनुदान व दहा एचपी, पंधरा एचपी कृषी पंपांची वीज बिले माफ करा, अशा मागण्या करण्यात आल्या.

No comments:
Post a Comment