कलेमुळे जीवन समृद्ध होते - प्रा. विक्रम बोकडे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी संस्कार शिबिराची उत्साहात सुरुवात - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2026

कलेमुळे जीवन समृद्ध होते - प्रा. विक्रम बोकडे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी संस्कार शिबिराची उत्साहात सुरुवात

 


चंदगड : प्रतिनिधी

    दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे उन्हाळी संस्कार शिबिराची सुरुवात पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात उत्साहात झाली. भारतीय संस्कृतीतील महत्त्वपूर्ण प्रतीक असलेल्या फेट्याच्या जतन आणि संवर्धनासाठी शिबिराअंतर्गत फेटा बांधण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

    कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले प्रा. विक्रम बोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "फेटा बांधण्याची कला प्रत्येकाने आत्मसात करावी. कलेमुळे जीवन समृद्ध होते."

    यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून फेटा बांधण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. या कार्यशाळेत परिसरातील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संजय साबळे व शरद हदगल यांनी केले.

    कार्यक्रमास जे. जी. पाटील, टी. व्ही. खंडाळे, सुहास वर्पे, वैशाली पवार, विद्या शिंदे, वर्षा पाटील, विद्या डोंगरे, पूजा कोळी, साधना भोसले, भाग्यश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक कलेचे महत्त्व समजून घेता आले असून, संस्कृती जपण्याची प्रेरणा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment