नेसरी / शिप्पूर
शिप्पूर तर्फे नेसरी येथील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये मंजूर झाले असून, या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
सौ. भारतीताई जाधव यांच्या शुभहस्ते व नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे, शिप्पूरचे सरपंच सचिन गुरव, माजी पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्त्याच्या कामाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी दोन्ही गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती. आमदार पाटील यांनी निधी मंजूर केल्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांची वाहतुकीची समस्या सुटणार आहे.

No comments:
Post a Comment