पंचायत राज समितीची तेऊरवाडीला भेट, गावची केली पाहणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2026

पंचायत राज समितीची तेऊरवाडीला भेट, गावची केली पाहणी

तेऊरवाडी येथे पंचायत राज समितीने भेट दिली. यावेळी स्थंभाचे पूजन करताना अधिकारी वर्ग

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज समितीने तेऊरवाडी (ता. चंदगड) गावाला भेट देवून गावची पाहणी केली.

यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज समितीचे अध्यक्ष राजापूरचे गटविकास अधिकारी निलेश जगताप, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नंदलव सूर्यवंशी, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सुनिल पाटील, कृषी विस्तार अधिकारी प्रथमेश पाटील, शाखा अभियंता विनायक पोवार, पंचायत विस्तार अधिकारी श्री. ठोंबरे या सर्वांनी तेऊवाडीला भेट देवून विविध विकास कामांची व गावच्या स्वच्छतेची पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते आजादी का अमृत महोसव स्थंभाचे तसेच तालमितील शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील महिलांनी विठ्ठल विठ्ठल गजर करत नृत्य सादरीकरन केले. तर युवक युवतीनी मर्दानी लाठी काठी खेळाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी समितीने गावची पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंचा सौ. मनिषा पाटील, उपसरंच प्रकाश दळवी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत एन. व्ही. पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment