चंदगड / प्रतिनिधी
शिरोली (ता. चंदगड) येथे "एक धाव आरोग्यासाठी " आयोजित केलेल्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शिवनेरी किंग संघ प्रथम क्रमांक पटकावला. तर दुसरा क्रमांक संतोष आरमारी व तिसरा क्रमांक छावा वॉरियर्स या संघानी मिळवला या स्पर्धेत एकूण ५संघानी भाग घेतला होता.
धावपळीच्या जीवनात आजचा युवक मोबाईल मध्ये हरवत चालल्याने व्यायामापासून दूर झाला आहे. परिणामी युवकांमध्ये अनेक आजाराचे प्रमाण वाढले आहे. युवकांमध्ये व्यायामा विषयी आवड निर्माण व्हावी या साठी नोकरी निमित्तानं बाहेर गावी असलेले व स्थानिक क्रिकेट प्रेमी युवकांनी एकत्र येत ९ मे ते ११ मे २०२६ दरम्यान शिरोली प्रीमियर लीग २०२६ क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजयी संघाना प्रथम ५००१ रुपये शरदराव राघव (कोषाध्यक्ष, म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई) दुसरे बक्षिसे ४००१ रुपये यशवंतराव देसाई (कार्याध्यक्ष म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई)तिसरे बक्षिस ३००१ नारायण मासरणकर (उद्योजक, बेळगाव) यांच्या तर्फे देण्यात आले होते. भगवान राघव, शिवाजी दोरुगडे, सागर मासरणकर, संतोष दोरुगडे, दीपेश शिताप यानी संघाचे पालकत्व स्वीकारले.
या स्पर्धेच्याआयोजनासाठी करण्यासाठी भगवान राघव ( मा.अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजन्सी अनंतम, डोंबिवली) यांनी परिश्रम घेतले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील खालील क्रिकेट प्रेमिनी योगदान दिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रथमेश मासरणकर, आदर्श देसाई, राजेश पाटील, ब्रम्हदेव नलवडे, सागर मासरणकर, अरुण पाटील, शिवाजी दोरुगडे,ओंकार पाटील, नामदेव सुभेदार, दिगंबर पाटील, अनिल नलवडे, सचिन सिताप, साईनाथ सिताप, संतोष मासरणकर, संदीप सिताप, अमर मासरणकर, देवराज देसाई, दिग्विजय देसाई, बंडू सुतार, रोहित राघव, हर्षवर्धन राघव, सुशांत सिताप, अक्षय पाटील, आदित्य परीट, यश नलवडे, सुजल सिताप, आर्यन सिताप, अशोक कांबळे, इंद्रजीत पाटील, स्वप्नील देसाई, दीपेश सिताप, कृष्णा शिंदे, क्रिश देसाई, अखिलेश गुरव, कुणाल नलवडे, प्रितम पाटील, सागर पाटील, साईनाथ पाटील, मयुर पाटील, आदित्य गुरव, विलास दोरुगडे यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment