सत्तेवाडी येथून वृद्ध बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2026

सत्तेवाडी येथून वृद्ध बेपत्ता

सिताराम विठोबा साबळे 

चंदगड / प्रतिनिधी

सत्तेवाडी (ता. चंदगड) येथून सिताराम विठोबा साबळे (वय वर्ष ७८) हे वृद्ध मंगळवार दि.२ जून पासून घरातून काहीही न सांगता बेपत्ता झाले आहेत. सिताराम साबळे हे रंगाने गोरे असून त्यांनी अंगात पांढरे शर्ट, हाफ पँट, डोकीवर पांढरी गांधी टोपी गळ्यात पंढरीची माळ, कपाळी गंध,पायात रबरी चप्पल घातले आहेत. मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सिताराम हे सत्तेवाडी - पोवाचीवाडी दरम्यान चालत जात असलेले काही लोकांनी बघितल्याचे सांगितले. सिताराम साबळे यांची जवळचे नातेवाईक व मित्रमंडळी यांचे कडे चौकशी केली मात्र ते मिळून आले नाहीत.नातेवाईकांनी वडील हरवल्याची तक्रार चंदगड पोलिसात दिली आहे. या व्यक्तीबद्दल काही माहिती मिळाल्यास चंदगड पोलीस ठाण्याशी अथवा 7039418702, 9022677875, 9923381513 या भ्रमण ध्वनीवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment