चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटना आणि बेळगाव येथील चंदगड मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे संघटना आणि सोसायटी च्या सभासदांच्या दहावी व बारावी च्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि पहिली ते पाचवी पर्यंतच्याच्या गरजू व होतकरू, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण, असा संयुक्त कार्यक्रम रविवार (दि. 21) दु. 4 वाजता शानभाग हॉल, शंभू जत्ती मंदिर जवळ, गणेशपूर रोड येथे होणार आहे. तरी बेळगाव शहर व परिसरातील 10 वी व 12 वी च्या 70 टक्के वरील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाच्या प्रति रामदेव गल्ली, बेळगाव येथील चंदगड सोसायटीच्या कार्यालयात जमा करावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन प्रा. एम. के. पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9449384479, 9448691410, 9742079653 येथे संपर्क करावा.

No comments:
Post a Comment