बेंदराच्या स्पर्धेत बैल उधळल्याने तिघेजण जखमी, भडगाव येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2026

बेंदराच्या स्पर्धेत बैल उधळल्याने तिघेजण जखमी, भडगाव येथील घटना



गडहिंग्लज :  सी एल वृत्तसेवा 

बेंदराच्या स्पर्धेमध्ये बैल उधळल्याने तिघेजण जखमी झाल्याची घटना भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे सुरू असलेल्या बेंदराच्या बैल पळवण्याच्या स्पर्धेत सोमवारी दिनांक 27 जुलै 2026 रोजी घडली. यावेळी कल्लाप्पा कौजलगी (वय 60 राहणार भडगाव) चन्नाप्पा कौजलगी (वय 65 राहणार भडगाव), नितीन बाबुराव घाटगे (वय 45 राहणार मुमेवाडी) असे तिघेजण जखमी झाले.  त्यामध्ये कलाप्पा यांच्या डोकीला मार लागला तर नितीन घाटगे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात बैलाचे सिंग मोडल्याची चर्चा होती दुपारी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या शिवा पट्टणकुडी (राहणार भडगाव) यांची बैलजोडी पंचां समोर आणत असताना त्यातील एक बैल उधळला. स्पर्धा पाहत असणाऱ्या चनाप्पा यांच्यावर प्रथम हल्ला केला. यानंतर अन्य दोघेजण जखमी झाले यानंतर सदर बैल एका गटारीत अडकल्याने पुढील अनर्थ टळला. त्या बैलाला रोखून धरण्यासाठी दोन दोन कासरे लावून रोखण्याचा प्रयत्न करत होते.

No comments:

Post a Comment