चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची विधानभवनात सदिच्छा भेट! - चंदगड लाईव्ह न्युज

03 July 2026

चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची विधानभवनात सदिच्छा भेट!

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

आज विधानभवन येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली.

यावेळी मतदारसंघातील रस्ते, पूल, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, कृषी, वनक्षेत्रातील पायाभूत सुविधा तसेच विविध विभागांशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती मुख्यमंत्री महोदयांकडे केली.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण आणि संतुलित विकास व्हावा, ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि विकासकामांना आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यता तातडीने मिळावी, याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास, शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा यापुढेही कायम राहील. जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी विकासाची गती अधिक वाढविण्याचा माझा निर्धार आहे.

1 comment:

Changad Farmers Against Corruption said...

चंदगड कोल्हापूर प्रशासनात भ्रष्टाचाराचा उच्चांक! असहाय्य गरीब दिनदुबळ्या अन्नदात्या रयतेची लुट! भाजपा सरकारचा भ्रष्टाचाराला संपूर्ण पाठिंबा!!

आज कुणबी समाज, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी खोटे दस्त बनवून कुणबी समाजाच्या शेतजमिनी लुबाडत असल्याने हवालदिल झाला आहे.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या राज्यात रयतेची लूटमारी, भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र भाजपा सरकारचे संरक्षण!

"सतत तीन वर्षे केंद्रातर्फे पुरस्कारीत, भ्रष्टाचारात अव्वल क्रमांक पटकावणारे भारतातील एकमेव राज्य - महाराष्ट्र!"

महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन!

हेच ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य! लोकमान्य टिळक, डॉ आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राज्य! आज तेच राज्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्याला कुणीही वाली उरला नाही.

"आमच्या अधिकाऱ्यांनी फक्त दिड लाख शेतकरी कुंटुंबांच्या जमिनी हडपल्या आहेत!" असे महसुलमंत्री मान्य करतात. पण एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी एवढी मोठी बोंब का?

खोटे दस्त बनवून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे प्रकार होत असल्याने शेतकरी हैरान आणि हताश झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने भ्रष्ट्राचार करणे न्यू नॉर्मल ठरवले आहे कि काय असे वाटू लागले आहे. दिड - दोन वर्षांपासून आम्ही चंदगड, गडहिंग्लज या कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातील खोटे दस्त बनवून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचे स्कॅम रॅकेट मुख्यमंत्री ते महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांना अवगत करून देत आहोत. पण परिणाम शून्य!! अशी दुर्दशा झाली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज्यांच्या रयतेच्या राज्याची!!! मुळात मुख्यमंत्री भ्रष्ट्राचार हा गुन्हाच समजत नाहीत! पाहाः See the proofs of corruption in Chandgad, Gadhinglaj, Kolhapur:
https://sites.google.com/view/maha-farmers-agnst-corruption/forged-docs

Post a Comment