चंदगडमध्ये रविवारी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2026

चंदगडमध्ये रविवारी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन

 

चंदगड / प्रतिनिधी : 

    चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांचा भव्य नागरी सत्कार रविवार, दि. १२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता चंदगड येथे आयोजित करण्यात आला आहे. ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला ५५ गावांच्या हेरे सरंजाम प्रश्नाला कायमस्वरूपी मार्गी लावून हजारो शेतकरी कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ हा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

    कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज चौक येथून श्री रवळनाथ मंदिरापर्यंत भव्य मिरवणुकीने होणार आहे. त्यानंतर श्री रवळनाथ मंदिराच्या सभागृहात सत्कार समारंभ पार पडणार आहे.

    या ऐतिहासिक कार्याबद्दल आमदार शिवाजीराव पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चंदगडवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिवाजीराव पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहून हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment